Site icon TravelHeal – Sharing our Travel experiences to make travel easy

Dandoba Hill Temple Bhose, Sangli – Trekking Guide

Hello friends, We recently done a trek to Dandoba hill in Bhose a Hill temple located in Sangli district. The place is our childhood memory as we stay in proximity and used to go there in Shrawan Month to take blessings of shiva. So today i will share our dandoba dongar trekking experience with you all and also history of Dandoba hill in Marathi.

Dandoba hill history and information in Marathi

तर मित्रानो दंडोबा हे एक हिल स्टेशन आहे जे आमच्यासाठी एक इमोशन आहे कारण आम्ही लहान असताना श्रावणाचा सोमवारी महादेवाचा दर्शन घ्यायला मालगाव मधुन ५ ते ६ किलोमीटर चालत दंडोबा डोंगर चढायचो. डोंगर तस्स छोटा आहे पण आम्ही लहानपणी चालत गावातून जायचो म्हणून वेळ लागायचा. आधी डोंगरावर काहीच सुविधा न्हवत्या पण आता दंडोबा डोंगर खूप डेव्हलोप झालेला आहे. आता तुम्ही डायरेक्ट बाईक किंवा कार घेऊन मंदिराजवळ जाऊ शकता किंवा बाईक वरून सिद्धेवाडी गावात जाऊन तेथून २ तसाच ट्रेक करू शकता. आम्ही खूप वेळा गेलोय डायरेक्ट पण आणि ट्रेक करून पण . पण त्याला खूप वर्षे उलटून गेली होती त्यामुळे आम्ही दंडोबा परत सर करायचा आणि youtube video बनवायचं ठरवलं. दंडोबा चा विडिओ पाहायला विसरू नका. त्यात संपूर्ण माहिती दिली आहे.

Dandoba Hill Temple Bhose, Sangli – Trekking Guide

Danodba Hill station Location – how to reach & trekking Information?

location wise म्हणायचं झाला तर सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याचा खरशिंग गावाजवळच्या ५ ग्रामपंचायतीचा हद्दीत सुमारे ११५० हेक्टर मध्ये पसरलेला हा एक डोंगर आहे . हा डोंगर सह्याद्री डोंगर रांगेमध्ये मोडतो. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर सांगली ची बस पकड सांगलीत उतरून परत मिरजेत या किंवा पुण्यावरून मिरज ला आला तरी चालेल. मिरजेत तुम्हाला भोसे ला जाणारी बस भेटेल ती पकडा आणि खरशिंग फाट्याला उतारा तेथून तुम्ही चालत दंडोबा वर जाऊ शकता, तिथे तुम्हाला दंडोबा डोंगराची कमान सुद्धा दिसेल.

Dandoba Mahadev temple Sangli

जर तुम्हाला ट्रेकिंग करायची आवड असेल तर तुम्हाला सिद्धेवाडी गावातून जाव लागेल. आणि खरंच Dandoba trek ला खूप मज्जा येते कारण. ट्रेक मध्ये तुम्हाला विविध प्रकारची फुलं, झाडी,प्राणी पाहायला भेटतात आणि मस्त physical activity सुद्धा होते.मालगाव मधून पुढे गेल्यावर गुंडेवाडी गाव लागत तेथून सिद्धेवाडी कडे turn घ्यायच आणि गुरव वस्तीला गाडी लावायची आणि तेथून ट्रेक ला सुरुवात. Dandoba hill trek time म्हणाल तर डोंगर चढायला अंदाजे दीड तास लागतात आणि उतरायला १ तास. trek difficulty म्हणाल तर हा ट्रेक खूप सोपा आहे. आम्ही १२ वर्षाचा असताना गावातून चालत जायचो त्यामुळे याला easy trek म्हणू शकता.

Watch dandoba trekking Vlog with all the information and History.

Dandoba trekking Vlog

Dandoba Dongar Information & History.

दानोबा डोंगराची माहिती आणि मंदिराचा इतिहास – या डोंगरावरचा प्रमुख आकर्षण म्हणजे दंडनाथाचं प्राचीन मंदिर यावरूनच याचा नाव दंडोबा पडले आहे. डोंगराला सुमारे १०० ते १२५ फूट पोखरून हे मंदिर बनवले गेले आहे. या प्राचीन मंदिरात प्रवेश केल्यानंतर गुहेमध्ये नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे.

Dandoba Mahadevachi Pind

पिंडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्राचीन गुहा सुद्धा आहे, जी खूप मोठी आणि सुरेख पद्धतीने बनवली गेली आहे. तिथे पुरातन काळातील चित्रेही होती जी कालांतराने पुसत झाली आहेत. महादेवाचा मंदिर असल्याने श्रावणाचा सोमवारी इथे भव्य यात्रा भरते आणि भरपूर भाविकही भेटीस येतात.

डोंगरावर सुमारे ३०० वर्षजपूर्वीच शिखर आजही सुस्थितीत इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. डोंगरमाथ्यावरचा शिखर आश्चर्यकारक आहे. पुजारी आणि देवस्थानाचा मते हे शिखर म्हणजे मंदिराचा कळसच आहे ड्रोन विडिओ मध्ये बघितला तर ते खरंच मंदिराचा कळस वाटत.. हे शिखर ५ माजली असून सर्वात वरचा भाग आहे तिथे ४ ते ५ मानस उभी राहू शकतात.

dandoba Tower history

पहिल्या टप्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथून पुढे वरती जायला मानव निर्मित पायऱ्या नाहीत. तिथे दगड ठेवलेत त्यावरून वरती जात येत. चौथ्या टप्यावरून वरती जाण्यासाठी परत पायऱ्या आहेत. त्यावरून एकावेळी एक माणूस वर जाईल एवढीच जागा आहे. शिखरावर गेल्यावर या परिसरातील सुमारे ६० ते ७० km चा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांनाच मते जर वातावरण चांगला आहेत तर शिखरावरून विजापूरचा गोल घुमटाचा शिखर दिसत.

दंडोबा हे डोंगरावर असलेला देवस्थान असून इथे कोणताही किल्ला नाहीय. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत क्रांतिकारकांचे नेते रत्नाप्पा कुंभार यांचे येथे गुप्ता पद्धतीने वास्तव्य आणि कचेरी होती.

Watch Dandoba Reels on Instagram – 2HeartsonWheels

दंडोबा डोंगरावर किल्ला नाहीय त्यामुळे येथे असलॆल्या शिखराचा बांधकाम नेमका कशासाठी कोणी आणि कोणाचा काळात झालाय हे सांगणं अवघडच आहे. आणि त्याचे कोठेही संदर्भ सुद्धा उपलब्ध नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील तर नसावा असा वाटत कारण ती बांधकाम शैली महाराजांच्या बाकी बांधकामांना मतच होत नाही.

तसाच हा भाग जास्त काळ आदिलशहाचा राज्यात होता. शिवरायांनी बांधला असता तर छोटासा का होईना किल्ला इथे बंधालाच असता. सह्याद्रीचा पोटात काय काय दादाला आहे हे एक रहस्यचं आहे, याचा एक नमुना म्हणजे दंडोबाच डोंगर. पुणे मुंबई चे ट्रेकर्स इकडे कमीच येतात. तसेच अभ्यासापासून वंचित राहिलेला हा प्रदेश आहे. नक्कीच कोणता ना कोणता रहस्य आणि इतिहास या डोंगरावर लपलेला आहे, हे शोधणं महत्वाचं आहे

About Author

I am Ketan Pujari Travel Blogger and Vlogger. I travel and publish our travel experiences on Youtube, Instagram and on this blog. Stay tuned with us for future updates. Let us know what we can improve in comments. Follow us below.

Instagram travel reels2Heartsonwheels – Follow
YouTube channelBhatkanti Travel Vlogs
Travel Blog – Travelheal.com

Travelblogger Ketan Pujari
Exit mobile version